आटपाडी मध्ये 100 बेड चे नवीन हॉस्पिटल व हेल्प लाईन सेंटर करा : जि.प. सदस्य अरुण बालटे यांची जिल्हाधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, September 14, 2020

आटपाडी मध्ये 100 बेड चे नवीन हॉस्पिटल व हेल्प लाईन सेंटर करा : जि.प. सदस्य अरुण बालटे यांची जिल्हाधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणीआटपाडी मध्ये 100 बेड चे नवीन हॉस्पिटल व हेल्प लाईन सेंटर करा : जि.प. सदस्य अरुण बालटे यांची जिल्हाधिकरी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये  कोव्हीड-19 चे  रुग्ण मोठ्या प्रमाणात सापडत असून याबाबत उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकारी  डॉ.अभिजित चौधरी यांना विविध मागण्यांच्या निवेदन जि.प. सदस्य अरुण बालटे यांनी दिले.


यामध्ये विविध मागण्या करण्यात आल्या असून आटपाडी मध्ये 100 बेड चे नवीन हॉस्पिटल व हेल्प लाईन सेंटर करावी अशी प्रमुख मागणी जिल्हाधिकारी सांगली यांच्याकडे करण्यात आली आहे.आटपाडी मध्ये हेल्प लाईन सेंटर चालू केल्यास तालुक्यातील कोरोना रुग्णांना जिल्हात कोठे-कोठे बेड उपलब्ध होतील याची माहिती मिळेल.  


त्यामुळे त्यांचा त्रास कमी होईल. त्याचबरोबर आटपाडी शहरात 100 बेड चे नवीन हॉस्पिटल उभारणी करावे. तालुक्यात आरोग्य विभागाचा स्टाफ कमी असून  तो स्टाफ तात्काळ भरण्यात यावा. तालुक्यासाठी  ऑक्सिजन ची व्यवस्था असणारी 1 ॲम्बुलन्स उपलब्ध व्हावी. इत्यादी मागण्या करण्यात आल्या आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise