कोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 30, 2020

कोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभकोरोना संदर्भात मोबाईल व्हॅनद्वारे जनजागृती  जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते शुभारंभ

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : केंद्र शासनाच्या माहिती व प्रसारण विभागाच्या क्षेत्रीय लोक संपर्क ब्युरो कोल्हापूर विभागाच्यावतीने तयार करण्यात आलेल्या मोबाईल व्हॅनद्वारे जिल्ह्यात कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात जनजागृती करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांच्याहस्ते आज करण्यात आला.


जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या कार्यक्रमाप्रसंगी क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी अंकुश चव्हाण, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भूपाल गिरीगोसावी, सहायक क्षेत्रीय प्रसिद्धी अधिकारी सतीश घोडके उपस्थित होते. जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी म्हणाले, कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने अनेकविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून कोरोना साखळी तोडण्यासाठी कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात मास्क वापरणे, वारंवार हात धुणे, शारिरीक अंतर राखणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी या मोहिमेंतर्गत घरोघरी भेटी देणाऱ्या आरोग्य पथकाला सत्य ती माहिती देऊन सहकार्य करणे आदिंबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले.


सांगली जिल्ह्यातील कोरोना हॉटस्पॉट क्षेत्रात विविध बाबतीत नागरिकांचे प्रबोधन आणि आरोग्य विषयक काळजी घेण्यासाठी या मोबाईल व्हॅनवरुन शाहिरी कलापथक, ऑडिओ क्लिपद्वारेही 30 सप्टेंबर ते 19 ऑक्टोबर या कालावधीत जनजागृती केली जाणार आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise