आटपाडीत प्रभारी गटशिक्षणाधिकारांच्या मनमानी कारभाराविरोधात प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक ; अन्यथा तीव्र आंदोलन करणार ; शामराव ऐवळे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 29, 2020

आटपाडीत प्रभारी गटशिक्षणाधिकारांच्या मनमानी कारभाराविरोधात प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक ; अन्यथा तीव्र आंदोलन करणार ; शामराव ऐवळेआटपाडीत प्रभारी गटशिक्षणाधिकारांच्या मनमानी कारभाराविरोधात प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक ; अन्यथा तीव्र आंदोलन करणार ; शामराव ऐवळे 

माणदेश एक्सप्रेस टीम  


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी येथील प्रभारी गटशिक्षणाधिकारांच्या मनमानी कारभाराविरोधात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती आक्रमक झाली असून त्यांच्या विरोधात गटविकास अधिकारी पंचायत समिती आटपाडी यांना निवेदन देण्यात आले आहे.


शिक्षक संघटना यांना विश्वासात न घेणे, शाळांचे प्रलंबित प्रश्न, शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न न सोडविणे, जाणीवपूर्वक समन्वयाचा अभाव ठेवणे, माझे कुटुंब माझी जबाबदारी उपक्रमात शिक्षकांचा प्रतिसाद असताना त्यांना विनाकारण त्रास देणे व शिक्षकांना वेठीस धरणे असे प्रकार प्रभारी गटशिक्षणाधिकारी करीत आहेत.


याबाबत वरील मागण्यांचा सहानुभूतीपूर्वक विचार व्हावा अन्यथा शिक्षकांच्या हितासाठी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समितीचे तालुकाध्यक्ष शामराव ऐवळे सरचिटणीस प्रविण बाड यांनी दिला आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise