आटपाडी पोलीस ठाणेत ३ सावकराविरुद्ध सावकरी अंतर्गत गुन्हे दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 17, 2020

आटपाडी पोलीस ठाणेत ३ सावकराविरुद्ध सावकरी अंतर्गत गुन्हे दाखल

 


आटपाडी पोलीस ठाणेत ३ सावकराविरुद्ध सावकरी अंतर्गत गुन्हे दाखल  

माणदेश एक्सप्रेस टीम 

आटपाडी/प्रतिनिधी : १ लाख २० हजार रुपयाचे व्याजासहित २ लाख ४ हजार रुपये दिले तरीही आणखी पैशाची मागणी केल्याप्रकरणी आटपाडी येथील विनापरवाना  बेकायदेशीररित्या  खाजगी सावकारी करणारे हणमंततात्या पाटील, हसन नजीर तांबोळी आणि शंकर ड्रायव्हर (पूर्ण नाव माहिती नाही) यांच्याविरोधात आटपाडी पोलीस ठाणे येथे महाराष्ट्र सहकारी अधिनियम 2014 चे कलम ४, ३९, ४४, ४६, व भारतीय दंड विधान संहिता कलम ५०४. ५०६, ३४ प्रमाणे गुन्हे दाखल झाले आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की यातील फिर्यादी विठ्ठल गोरख कुंभार वय वर्ष ५८ धंदा शेती रा. दिघंची याने विनापरवाना  बेकायदेशीररित्या  खाजगी सावकारी व्यवसाय करणारा  हणमंततात्या पाटील याच्याकडून घरगुती व आर्थिक अडचणीमुळे महिना १० टक्के व्याजदराने १ लाख २० हजार रुपये घेतले होते. त्याला वेळोवेळी नियमापेक्षा जास्त म्हणजेच एकूण २ लाख ४ हजार रुपये व्याजापोटी दिलेले आहेत.


तरीही आणखी रुपयांची मागणी करत वरील आरोपींनी फिर्यादीस वारंवार फोन करून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी देवून त्रास दिला आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक श्री पाटील करीत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise