मेंढपाळास मारहाण प्रकरणी पिंपरी खुर्द येथील २० जणावर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, September 17, 2020

मेंढपाळास मारहाण प्रकरणी पिंपरी खुर्द येथील २० जणावर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल

आटपाडी पोलीस ठाणे समोर झालेली मेंढपाळांची गर्दी 


मेंढपाळास मारहाण प्रकरणी पिंपरी खुर्द येथील २० जणावर आटपाडी पोलिसात गुन्हे दाखल 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : पिंपरी खुर्द ता. आटपाडी, जि.सांगली येथे  मेंढपाळास व त्याच्या आईस दगड व काठीने मारहाण केल्याप्रकरणी   आटपाडी पोलिस ठाण्यात सुखदेव कदम याच्यासह अनोळखी २० जणावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.  


याबाबत अधिक माहिती अशी की, कोगनोंळी  ता.चिकोडी, जि. बेळगाव येथील मेंढपाळ विठ्ठल बाळू यमगर वय 20  सध्या रा. पिंपरी खुर्द व त्याची आई मालू बाळू यमगर पिंपरी खुर्द येथे मेंढ्या घेवून आले आहेत. लांडग्याने मारलेल्या बकरीचे मटन का दिले नाही या कारणाने चिडून जाऊन काल रात्री  पिंपरी खुर्द येथे मेंढपाळास मारहाण करण्यात आली होती. याची माहिती आज धनगर समाजाचे कार्यकर्त्यांना समजतात त्यांनी पिंपरी येथे जाऊन मेंढपाळाची विचारपूस केली.


यावेळी जिल्हा परिषदेचे माजी समाज कल्याण सभापती तथा विद्यमान जि.पं. सदस्य ब्रम्हानंद पडळकर, विष्णुपंत अर्जुन, रासपचे तालुकाध्यक्ष लक्ष्मण सरगर, भाजपचे नेते जयवंत सरगर, गणेश भुते आदी कार्यकर्त्यांनी येऊन मेंढपाळाची भेट घेऊन दिलासा दिला. मारहाण करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आटपाडी पोलीस ठाण्यातील अधिकाऱ्यांना भेटून केली.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise