आटपाडी : भिंत कोसळून दोन लहान मुली दगावल्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 18, 2020

आटपाडी : भिंत कोसळून दोन लहान मुली दगावल्या

 


आटपाडी : भिंत कोसळून दोन लहान मुली दगावल्या 

माणदेश एक्सप्रेस टीम


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरामध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. शहरातील सागरमळा येथील प्रकाश कुंभार यांच्या घराची भिंत कोसळून त्यांच्या दोन लहान मुली दगावल्या आहेत.


याबाबत अधिक माहिती अशी की, आटपाडी शहरातील सागरमळा येथे प्रकाश कुंभार याचे घर आहे. गेली ३ दिवस झाले आटपाडी शहरामध्ये मोठा पासून सुरु आहे. सदर पावसाने अनेकांची घरे जीर्ण झाली आहेत. आज सांयकाळी ४ च्या दरम्यान प्रकाश कुंभार यांच्या घराची भिंत कोसळून त्यामध्ये त्यांच्या मुली कु. वैशाली प्रकाश कुंभार (व.व.२) व तृप्ती प्रकाश कुंभार (व.व.३) यांचा मृत्यू झाला.


सध्या पाऊस मोठा असून अजून दोन दिवस पाऊस येणार असल्याने ज्याचे घर जीर्ण झाले असेल तर त्यांनी ताबडतोप घरातून बाहेर पडून जवळच्या प्राथमिक शाळा किंवा समाजमंदिरामध्ये आश्रय घ्यावा असे आवाहन सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे.   No comments:

Post a Comment

Advertise