आटपाडीत पोलीस निरीक्षकासह महावितरणचे उपअभियंता कोरोना पॉझीटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, September 5, 2020

आटपाडीत पोलीस निरीक्षकासह महावितरणचे उपअभियंता कोरोना पॉझीटिव्हआटपाडीत पोलीस निरीक्षकासह महावितरणचे उपअभियंता कोरोना पॉझीटिव्ह


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक व  महावितरणचे उपअभियंता यांचा कोरोना अहवाल पॉझीटिव्ह आल्याने आज तालुक्यासह शहरात खळबळ माजली आहे.


आटपाडी तालुक्यातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच असुन दुपारी माजी आमदार राजेंद्रआण्णा देशमुख व आरपीआयच्या युवा नेत्याचा कोरोना अहवाल पॉझिटीव्ह आला होता. त्यामुळे आज दुपारच्या सत्रात राजकारणी नेत्या नंतर प्रशासकीय अधिकाऱ्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्याने नागरिकांच्या चितेत वाढ झाली आहे.


आज पॉझीटिव्ह आलेल्यांच्या संपर्कातील लोकांनी माहिती घेण्याबाबत आरोग्य विभागाकडून काम सुरु आहे. आटपाडी शहर हे तालुक्याचे ठिकाण असल्याने बाहेर गावाहून मोठ्या संख्येने नागरिक आटपाडी येत असल्याने आटपाडीमध्ये कडकडीत लॉकडाऊन पाळावा. अशी मागणी नागरिकासह व्यापारी वर्गातून होत आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


1 comment:

  1. लाँकडाउन जरुर घ्या परंतु त्याचे पालन कडक झाले पाहिजे

    ReplyDelete

Advertise