ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, September 8, 2020

ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक ड्रग्स प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक


मुंबई : सुशांतसिहं राजपूत मृत्यू प्रकरणात ड्रग्स कनेक्शन प्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार रियाने चौकशीदरम्यान ड्र्ग्स घेतल्याचं कबूल केलं आहे. सुशांत आणि त्याच्या मित्रांसोबत अनेकदा ड्रग्स घेतल्याचंही तिने मान्य केलं आहे. अटकेनंतर आता रियाची मेडिकल टेस्ट केली जाणार आहे.


पुरावे मिळाल्यानंतर रियाला अटक करण्यात आली आहे, असं बिहारचे डीजीप गुप्तेश्वर पांडे यांनी म्हटलं आहे. रियाचे ड्रग्स माफियांसोबत संबंध असल्याचंही उघड झालं आहे. रिया सराईत गुन्हेगार नसल्याने तिला रिमांडची गरज नाही, असं नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे उपसंचालक केपीएस मल्होत्रा म्हणाले.


No comments:

Post a Comment

Advertise