आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, September 4, 2020

आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहाआटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज दिनांक ४ रोजी कोरोनाचे ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे नागरिकांची आज थोडीशी चिंता कमी झाली आहे.  


आज आलेल्या अहवालामध्ये तालुक्यामध्ये आजच्या नवीन रूग्णा मध्ये आटपाडी शहरामध्ये १ नवीन रुग्ण, यपावाडी १ रुग्ण, लेंगरेवाडी १ रुग्ण, दिघंची ३ रुग्ण व गोमेवाडी येथे १ रुग्ण आढळून आले आहेत. तर तालुक्या बाहेरच्या असणाऱ्या सांगोला तालुक्यातील जुनोनी येथील १ रुग्ण यांचा कोरोना पॉझीटिव्ह रूग्णामध्ये समावेश आहे. यामध्ये पुरुष ६ व स्त्री २ असे एकूण ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.


वाढत असणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे व काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी नागरिकांना केले आहे. 

(टीप सदरील माहिती सायंकाळी ६.०० वा. पर्यंत ची आहे.)


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise