आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे ८ नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर
माणदेश एक्सप्रेस न्युज
आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यामध्ये कोरोना रुग्ण वाढण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणावर सुरु असून आज दिनांक १ रोजी ८ नवे रुग्ण आढळून आले आहेत.
आजच्या नवीन रूग्णामध्ये विशेष म्हणजे शहरातील एकाही रुग्णाचा समावेश नसल्याने आटपाडीकरांची धाकधूक काही प्रमाणात आजच्या दिवशी तरी कमी झाली आहे.
तालुक्यातील आज पिंपरी खुर्द येथे २ व पिंपरी बु. १ असे नवे रुग्ण आढळून आले आहेत. तर निंबवडे येथेही २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. बोंबेवाडी १ खरसुंडी १, वलवण १ असे एकूण ८ नवीन रुग्ण आढळून आले असल्याची माहिती तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी दिली आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज