सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 30, 2020

सांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठासांगली जिल्ह्यातील वारणा धरणात 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा

माणदेश एक्सप्रेस टीम


सांगली : जिल्ह्यातील वारणा धरणात आज सकाळी 8 वाजेपर्यंत 34.40 टी.एम.सी. पाणीसाठा असून हे धरण 100 टक्के भरले आहे. तसेच कोयना, दुधगंगा, तुळशी, धोम बलकवडी, उरमोडी, तारळी व अलमट्टी ही धरणेही 100 टक्के भरली असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.


 धोम धरणात 13.26 टी.एम.सी पाणीसाठा असून साठवण क्षमता 13.50 टी.एम.सी, कण्हेर धरणात 10.01 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 10.10 टी.एम.सी., राधानगरी धरणात 8.18 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 8.36 टी.एम.सी., कासारी धरणात 2.74 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 2.77 टी.एम.सी.,  पाटगाव धरणात 3.69 टी.एम.सी. पाणीसाठा असून साठवण क्षमता 3.72 टी.एम.सी. आहे.


सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे विविध धरणातून सोडण्यात आलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना 1050, धोम 70, कण्हेर 24, दूधगंगा 600, तुळशी 128, कासारी 250, पाटगाव 300 व अलमट्टी धरणातून 38 हजार 922 क्युसेक्स विसर्ग सुरू आहे. विविध  पुलाच्या ठिकाणी  पाण्याची  आजची  पातळी  व  कंसात इशारा पातळी  फूटामध्ये पुढीलप्रमाणे आहे. कृष्णा  पूल  कराड 5.10 (45), आयर्विन  पूल सांगली 8.6 (40) व अंकली पूल हरिपूर 8.10 (45.11).


गेल्या 24 तासात कवठेमहांकाळ तालुक्यात 0.2 मि.मी. व आटपाडी तालुक्यात 4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून इतर सर्व तालुक्यात पावसाने उघडीप दिली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise