आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे 31 नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, September 2, 2020

आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे 31 नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर
आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे 31 नवे रुग्ण ; कोणत्या गावात किती रुग्ण पहा सविस्तर 

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यात आज कोरोनाचे 31 नवे रुग्ण आढळून आले असल्याने पुन्हा एखदा भितीचे वातावरण असले तरी अजून ही नागरीका गाफील असल्याचे दिसून येत आहे.  


आज आलेल्या नवीन रूग्णामध्ये आटपाडी शहरामध्ये १७ नवे रुग्ण आढळून आले आहेत. दिनांक १ रोजी एकही कोरोना पॉझीटीव्ह रुग्ण आढळून आला नसल्याने नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला होता. परंतु आज पुन्हा एखदा १७ रुग्ण आढळून आल्याने भितीचे वातावरण पसरले आहे.


तालुक्यामध्ये आजच्या नवीन रूग्णा मध्ये उंबरगाव येथे ३ नवे रुग्ण आढळून आल्याने उंबरगावमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे. पिंपरी बु. येथे ४ नवीन रुग्ण आढळून आले आहेत. बेरगळवाडी येथे ही कोरोनाने शिरकाव केला होता. शेटफळे येथे ही कोरोनाचे २ नवे रुग्ण आढळून आले आहेत. निंबवडे १, दिघंची २ व तडवळे येथे १ रुग्ण आढळून आल्याने आज आढळून आलेल्या रुग्णांची संख्या ३१ झाली आहे.


वाढत असणाऱ्या रूग्णामुळे नागरिकांनी स्वत:ची काळजी घावी शासनाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करावे. नेहमी मास्कचा वापर करावा. सोशल डिस्टस्निंगचे पालन करावे व काम असेल तरच घरातून बाहेर पडण्याचे आवाहन तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. साधना पवार यांनी नागरिकांना केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

   


No comments:

Post a Comment

Advertise