Type Here to Get Search Results !

अजनाळे परिसरातील ३० टे ४० शेळ्या मृत्यूमुखी ; पशुवैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष



अजनाळे परिसरातील ३० टे ४० शेळ्या मृत्यूमुखी ; पशुवैद्यकीय अधिकारी यांचे दुर्लक्ष

माणदेश एक्सप्रेस टीम


अजनाळे/वार्ताहर : अजनाळे तालुका सांगोला येथे गेल्या पंधरा   दिवसापासून निमोनिका या आजारामुळे गावातील ३० ते ४० शेळ्या दगावल्यामुळे पशु पालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. शेळ्या मृत्युमुखी पडण्याचे प्रमाण दिवसेदिवस वाढत चालले आहे. त्यामुळे पशु पालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.  


पशुपालकांनी जीवापाड जपलेल्या शेळ्या दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात  मृत्युमुखी पडत असून पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष देऊन वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार सचिन धांडोरे यांनी केली आहे. अजनाळे येथील पशुवैद्यकीय दवाखाना गेल्या दोन महिन्यापासून बंद अवस्थेत असल्यामुळे येथे पशुवैद्यकीय अधिकारी सुट्टीवर असल्याने हा दवाखाना म्हणजे असून अडचण नसून खोळंबा अशी दयनीय अवस्था या दवाखान्याची झाली आहे.  



दररोज वेगवेगळे आजाराने शेळ्यामेंढ्या मृत्यूमुखी पडत असल्यामुळे जिवापाड जपलेल्या शेळ्या जगतील का? नाही हे सांगता येत नाही. वरिष्ठ अधिकाऱ्यांना याची माहिती देऊन सुद्धा वरिष्ठ अधिकारी उंटावरून शेळ्या राखण्याचे काम करत आहेत. त्यामुळे याचा जाब कोणाला विचारायचा? याला जबाबदार कोण? अजून किती शेळ्या मृत्युमुखी पाडायच्या आहेत याची पशुवैद्यकीय अधिकारी वाट बघत नाहीत ना? अशी चर्चा अजनाळे परिसरातून व्यक्त केली जात आहे.   


तरी वरिष्ठ पशुवैद्यकीय अधिकारी यांनी लक्ष घालून मृत्युमुखी पडलेल्या शेळ्यांचा पंचनामा करून आर्थिक नुकसान भरपाई मिळावी  अशी मागणी पशुपालकांमधून मोठ्या प्रमाणात केले जात आहे.



Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies