Type Here to Get Search Results !

म्हसवड येथे नागरिकांच्या सहकार्यातून उभे राहणार १५ बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल ; मदतीसाठी अनेक दानशूर लोकांची मदत ; सामान्य नागरिकांचीही स्वयंफूर्तीने आर्थिक मदत



म्हसवड येथे नागरिकांच्या सहकार्यातून उभे राहणार १५  बेडचे ऑक्सिजन हॉस्पिटल ; मदतीसाठी अनेक दानशूर लोकांची मदत ; सामान्य नागरिकांचीही स्वयंफूर्तीने आर्थिक मदत

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : नागरिकांच्या सहकार्यातून सामान्य नागरिकांना १५ बेडचे मोफत कोरोना केअर सेंटर सुरू केले जात असुन या कोरोना केअर सेंटरसाठी आवश्यक साधनांसाठी नागरिकांनी स्वयंफूर्तीने आर्थिक मदतीसाठी पुढे सरसावले आहेत.


म्हसवड शहर व परिसरात दिवसेंदिवस कोरोना बाधित रुग्ण सापडून येत आहेत. म्हसवड शहरातच ३०० च्या पुढे संख्या गेली असुन कोरोना बाधित रुग्णास सातारा व इतर जिल्ह्यातही उपचारासाठी हॉस्पिटल मध्ये जागाच उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे रुग्ण दगावण्याचे प्रकार घडू लागले आहेत.


स्थानिक पातळीवर अत्यवस्थ रुग्णास मोफत उपचार अंतर्गत १५  ऑक्सिजन बेडचे हॉस्पिटल येथील लांबमळा नजिकच्या शासकीय वस्तिगृह इमारतीत ऊभारण्याचा निर्णय नागरिकांनी घेतला असुन या इमारतीत १५ बेडला ऑक्सिजन पुरवठा करणारी यंत्रणेचे काम तातडीने पुर्ण करण्यात आले आहे. या उपक्रमास नागरिकांनी स्वयंफूर्तीने प्रतिसाद दिला असुन अनेक दानशुरांनी मदतही दिली आहे तर काहीं मदत देऊ करत आहे.


या नियोजित कोरोना केअर हॉस्पिटलसाठी शासनानेही मदत करुन आवश्यक त्या संख्येने कर्मचारी, डॉक्टर व गरजेची ओषधे तातडीने उपलब्ध करुन देणेसाठी प्रांताधिकारी, तहसिलदार, तालुका आरोग्य अधिकारी  यांनी सहकार्य करावे अशी मागणी नागरिकांची आहे.


दरम्यान या रुग्णालयातील १५ बेडच्या ऑक्सिजन (ओटी) सेटअप साठी येथील धनंजीभाई नेमचंद शहा ट्रस्टचे सुभाष हिराचंद शहा सातारा (म्हसवडकर), अरंजय नानचंदशेठ शहा (नगरशेठ) संजय शेठ नानचंदशेठ शहा यांनी एक लाख तीस हजार रुपयांचा धनादेश देऊन या सेवाभावी उपक्रमात सर्वप्रथम सहभाग घेतला तसेच या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी दाखल  झालेल्या रुग्णास गरजच भासली तर नियमित मोफत नाष्टा व सकस जेवण देण्याचे आश्वासन  शहा कुटुंबाने दिले आहे. तसेच म्हसवड येथील राजकुमार दिनकर सूर्यवंशी व त्यांचे बंधू राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे म्हसवड शहर अध्यक्ष नगरसेवक युवराज दिनकर सूर्यवंशी व म्हसवड पालिकेच्या उपनगराध्यक्षा सौ.स्नेहल युवराज सूर्यवंशी व परिवाराने या कोविड हॉस्पिटलच्या उभारण्याकामी ५१ हजार रुपयाची मदत जाहिर केलीआहे.  


येथील नगसेविका श्रीमंत सौ.हिंदमालादेवी  विजयसिंह राजेमाने यांनी २१ हजार रुपयांची मदत दिली आहे. तर अरूण शेठ मगरूळे यांनी या नियोजित हॉस्पिटलसाठी आवश्यक असलेल्या वस्तुसाठी ५ हजार रुपये,  कांदा व भाजीपाला आडत व्यापारी जनाब फारूक सिजाउद्दीन काझी यांनी ११ हजार रूपये, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माण तालुका अध्यक्ष,पत्रकार नागेश्वर आबासाहेब विरकर यांनी साडे चार हजार रुपये, म्हसवड रेशन दुकानदार असोसिएशन वीस हजार रूपये किमतीचे साहित्य, गणेश कवडे यांनी ५ हजार रुपये किमतीची गरजेची वस्तु देय केली आहे. शेतकरी कलेक्शन चे संचालक कापड व्यापारी यांनीही ५००० हजार १०० रुपये मदत देऊ केली आहे. महाराष्ट्र रंगकामगार संघटना तर्फे या संघटनेचे अध्यक्ष विश्वासराव साळुंखे व कार्याध्यक्ष धनाजीशेठ सावंत यांनीही या नियोजित हॉस्पिटलसाठी आवश्यक ती मदत देण्याची तयारी दाखविली आहे.


फुटाणे हॉस्पिटलचे संचालक डॉ.सुर्यकांत फुटाणे यांनी या कोविड हॉस्पिटलसाठी दोन बेड व  सक्शन (Suctiom   Macine -1 ) देणेचे मान्य केले आहे. डॉ.राजेंद्र मोडासे यांनी या नियोजित कोवीड हॉस्पिटलसाठी एक्सरे मशीन व त्यासोबतच दोन बेड देऊ केले आहे. विजय मेंढापूरे यांनी बेड साईटच्या ट्रॉली देणेचे मान्य केले. मुस्लिम धर्मिय अरिफ बशीर तांबोळी यांनीही पाच हजार रुपयांची मदत केली आहे. बाळासाहेब पानसांडे यांनी ११ हजार रुपये देवू केले आहेत. देवांग समाजाचे पांडुरंग दवंडे यांनी पत्नी मालन यांच्या स्मणार्थ पाच हजार एक रुपये मदत दिली आहे. लक्ष्मी गणेश मंडळाने या उपक्रमास ११ हजार रुपयांच्या मदतीचे योगदान दिले आहे. तर सातारा येथील सीताराम ज्वेलर्सचे संचालक दिवड ता. माण येथील अशोकशेठ सीताराम सावंत यांनी कोविड सेंटर साठी सुमारे चाळीस हजार रुपये किमतीची ऑक्सिजन मशीन देऊ केली आहे.  


ज्यांना या हॉस्पिटलसाठी वस्तु स्वरुपात मदत करण्याची इच्छा आहे त्यांनी तातडीने संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. म्हसवड  कोविड हॉस्पिटल मदतीसाठी अहिंसा नागरी पतसंस्था मध्ये म्हसवड कोविड १९ या नावाने  सेव्हिंग खाते नं २००३२८३ उघडले आहे. दुर गावातील नागरिकांना मदत  पाठवण्यासाठी अहिंसा नागरी सहकारी पतसंस्था/ICICI BANK mhaswad AC No 176805004506   IFC COD  ICIC 0001768  या खात्यात वर भरल्यानंतर संबधित देणगीदारांनी ९४२३८२७५२९ या मोबाईल  नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies