’दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती’ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 31, 2020

’दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती’

 


’दारुप्रमाणे मंदिरातून महसूल मिळाला असता तर दारं उघडली असती’

मुंबई : दारूची दुकाने उघडून मिळाला तसा महसूल मंदीर उघडून मिळाला असता तर मंदिराची दारे कधीच उघडली असती असा टोला भाजपचे आमदार अतुल भातखळकर यांनी सरकारला लगावला आहे. मंदिरात ज्यांचा श्वास घुसमटतो आणि नाईट लाईफच्या नावाने खुलतो त्यांची वृत्तपत्रे मंदीरे उघडण्याबाबत उदासीन असतील तर नवल ते काय? असा प्रश्न देखील त्यांनी उपस्थित करीत सामना वर देखील टीका केली आहे. 


कोरोनाबाबत उपचार करण्यासाठी राज्यातील खाजगी रुग्णालयातील खाटा राज्य सरकारने ताब्यात घेणे आणि उपचाराचे दर नियंत्रित ठेवणे या निर्णयाची मुदत आज संपत आहे. याला मुदतवाढ घेण्याचा निर्णयमुख्यमंत्री घेत नाहीत. तेव्हा याबाबत निर्णय घ्यावा नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. 


हा निर्णय घ्यायला 22 मे चा मुहूर्त राज्य सरकारने काढला होता. म्हणजेच लॉकडाऊन जाहीर झाल्यावर सरकारने उशिराने निर्णय घेतला होता. आता या निर्णयाला मुदतवाढ देण्यास महाविकास आघाडी सरकार टाळाटाळ करत असल्याची टीका भाजपने केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise