माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन

माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे कोरोनामुळे निधन


पंढरपूर : सोलापूर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेते आणि माजी आमदार सुधाकरपंत परिचारक याचे पुण्यात निधन झाले आहे. पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान सोमवारी रात्री 11.35 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला, ते 85 वर्षांचे होते. सुधाकरपंत परिचारक यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांच्यावर पुण्यातील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते. 


सुधाकरपंत परिचारक यांना काही दिवसांपूर्वी करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्यावर पंढरपुरात उपचार करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्यांना पुण्यातील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. अखेर काल रात्री साडे अकराच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली. भाजपचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे चुलते होते.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise