शेनवाडीत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्या कडून महिलेचा विनयभंग - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 1, 2020

शेनवाडीत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्या कडून महिलेचा विनयभंग


शेनवाडीत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्या कडून महिलेचा विनयभंग 

म्हसवड/प्रतिनिधी : शेनवडी ता. माण येथे महावितरणचे कनिष्ठ अभियंता धिरज गायकवाड यांचे विरोधात  लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केल्याचा गुन्हा तर सचिन पांडुरंग वाघमारे यांचे विरुद्ध शासकिय कामात अडथळा आणल्याचा  असा परस्पर विरोधी तक्रार  म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाल्या आहेत.


शेनवडी ता. माण जि. सातारा येथील ३३/११ के.व्ही उपकेंद्रावर इनकमर नंबर १ ची सी.टी. दुरुस्ती करत असताना धीरज गणपत गायकवाड़ कनिष्ठ अभियंता महावितरण देवापुर यांचे काम सुरु असताना प्रतिबंधीत ठिकाणी सचिन पांडुरंग वाघमारे याने तेथे येवून शिवीगाळ करुन, कॉलर ओढून, कानाखाली मारली व ढकलून दिले. या प्रकरणी शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी वाघमारे यांचेवर म्हसवड पोलिसात गुन्हा दाखला करण्यात आला असुन अधिक तपास म्हसवड पोलिस ठाणे करत आहे.


 तर कनिष्ठ अभियंता धिरज गायकवाड़ याचे विरोधात वरिष्ठाकडे केलेली भ्रष्टाचाराची तक्रार मागे घे असे म्हणुन शेनवडी येथील राहत्या घरात मी व माझा मुलगा सचिन वाघमारे बसलो असताना घरात येवून अभियंता धिरज गायकवाड़, राजेंद्रकुमार, बालगंधर्व खिलारी, महादेव यादव यांनी  माझ्या मुलाला हाताने, लाथा बुक्याने मारहाण करुन जीवे मारण्याची धमकी देवून धिरज गायकवाड याने मला पाठी मागुन मिठी मारुन माझ्याकडे बघून लज्जा उत्पन्न होईल असे हाव भावाचे वर्तन केल्या प्रकरणी सौ संगीता पांडुरंग वाघमारे यांनी म्हसवड पोलिसात गुन्हा दाखला केला आहे. अधिक तपास सपोनि गणेश वाघमोडे करीत आहेत.No comments:

Post a Comment

Advertise