राज्य शासनाने १७ IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 28, 2020

राज्य शासनाने १७ IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणेराज्य शासनाने १७  IAS अधिकाऱ्यांच्या केलेल्या बदल्या व त्यांची नियुक्ती ठिकाणे  


मुंबई : राज्य शासनाने  एकूण  17 IAS  अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. या बदल्यामध्ये प्रामुख्याने सीताराम कुंटे यांच्यासह तुकाराम मुंढे, दीपा मुधोळ-मुंढे यांचा समावेश आहे.  


सामान्य प्रशासन खात्याचे अपर मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटे यांना महत्वाच्या गृह खात्यात नियुक्ती करण्यात आली आहे. तर कामाचा अधिकारी अशी ओळख असणाऱ्या तुकाराम मुंढे यांची बदली मात्र दुय्यम ठिकाणी करण्यात आली आहे. दुर्लक्षित असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य सचिव म्हणून मुंढे यांची बदली करण्यात आली आहे मुंढे यांच्या बदलीमुळे नागपूर महापालिका आयुक्त पदावर बी. राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे.


बदली झालेल्या अधिकाऱ्यांची नावे 

 • 1. सीताराम कुंटे, सामान्य प्रशासन खात्याच्या अपर मुख्य सचिवपदावरून गृह खात्याच्या अपर मुख्य सचिव पदावर नियुक्ती 
 • 2. सुजाता सौनिक, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याच्या अपर मुख्य सचिवपदावरून सामान्य प्रशासन खात्याच्या अपर मुख्य सचिव पदावर नियुक्ती 
 • 3. डॉ. एन. बी. गीते, महानंदच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरून महावितरणच्या (औरंगाबाद) सह व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती 
 • 4. अविनाश ढाकणे, परिवहन आयुक्त पदावर नियुक्ती 
 • 5. एस. एस. पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावरून सिडकोच्या ( नवी मुंबई ) सहसंचालक पदावर नियुक्ती. 
 • 6. कैलास जाधव, एमआयडीसीच्या सह मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नाशिक महापालिकेच्या आयुक्तपदी नियुक्ती
 • 7. एन. रामास्वामी, मेरीटाईम बोर्डाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून कुटुंब कल्याण आयुक्त पदावर नियुक्ती 8. शेखर चन्ने, परिवहन आयुक्त पदावरून महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक पदावर नियुक्ती 
 • 9.  राधाकृष्णन बी., नागपूर महापालिकेच्या आयुक्त पदावर नियुक्ती 
 • 10. चंद्रकांत डांगे, संचालक, जीएसडीए, पुणे 
 • 11. तुकाराम मुंढे, नागपूर महापालिका आयुक्त पदावरून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिव पदावर नियक्ती
 • 12. अण्णासाहेब मिसाळ, कोकण आयुक्तपदी नियुक्ती 
 • 13. एम. एम. देशपांडे, सामान्य प्रशासन विभागाच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती 
 • 14. लोकेश चंद्रा, जलसंपदा खात्याच्या प्रधान सचिव पदावर नियुक्ती 
 • 15. दीपा मुधोळ, जलस्वराज्य प्रकल्पाच्या प्रकल्प संचालक पदावर नियुक्ती 
 • 16. अंशु सिन्हा, सामान्य प्रशासन खात्याच्या सचिव पदावरून कौशल्य विकास खात्याच्या सचिव पदावर नियुक्ती 
 • 17. आर. विमला, राष्ट्रीय ग्रामीण जिवन्नोती अभियानाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून जल जीवन अभियानाच्या संचालक पदावर नियुक्ती

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise