स्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

स्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा

 स्व.आर.आर.आबा पाटील यांची आज जयंती त्यानिमित्त त्यांची राजकीय कारकीर्द व त्यांनी घेतलेलं निर्णय पहा


आटपाडी : माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आर. आर. पाटील यांची आज जयंती. उमद्या, लोकप्रिय आणि स्वच्छ प्रतिमेच्या नेता म्हणून आर. आर. पाटील यांनी राजकारणात आपली वेगळी ओळख निर्माण केली. राज्यभरात ते आबा या टोपणनावाचे ओळखले जायचे. आज त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या राजकीय प्रवासाबद्दल थोडीशी माहिती 


पूर्ण नाव – रावसाहेब रामराव ऊर्फ आर. आर. पाटील

जन्म – १६ ऑगस्ट १९५७

मृत्यू – १६ फेब्रुवारी २०१५

जन्मगाव – अंजनी, ता. तासगाव, जि. सांगली

शिक्षण – बी.ए., एल.एल.बी.

राजकीय प्रवास –

१९७९ – १९७९ मध्ये सांगली जिल्ह्यातील सावळजमधून जिल्हा परिषदेवर निवडून गेले. १९७९ ते ९० या काळात त्यांनी जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून काम केले.

१९९० – तासगावचे आमदार म्हणून पहिल्यांदाच विधासभेत

१९९०, १९९५, १९९९, २००४, २००९, २०१४ असे सलग सहा वेळा ते आमदार झाले

१९९६ – विधानसभेमध्ये सुरुवातीच्या काळात त्यांनी कॉंग्रेस पक्षाचे मुख्य प्रतोद म्हणून काम पाहिले.

१९९८ – विधानसभा लोकलेखा समितीचे अध्यक्ष म्हणून निवड झाली

१९९६-९७ आणि १९९८-९९ या काळात त्यांनी विधीमंडळाच्या लोकलेखा समितीचे अध्यक्षस्थानही भूषविले.

१९९९ – मध्ये शरद पवार यांच्या नेतृत्त्वाखाली स्थापन करण्यात आलेल्या राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षासोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. याच वर्षी त्यांची महाराष्ट्राच्या ग्रामविकास मंत्रीपदी नियुक्ती

२००४ – एक नोव्हेंबर २००४ रोजी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.

२००३ ते २००८ आणि २००९ ते २०१४ या काळात त्यांनी राज्याचे गृहमंत्री म्हणूनही काम सांभाळले.

२००८ – मुंबईतील दहशतवादी हल्ल्याच्यावेळी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मंत्रिपद गमावलं

२००९ – पुन्हा गृहमंत्रिपदी विराजमान

२००४ आणि २००९ – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्षपद भुषवलं


आबांनी घेतलेले धडाकेबाज निर्णय – 

 • राज्यात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान यशस्वीपणे राबवले
 •  ग्रामीण महाराष्ट्रामध्ये महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान राबवले
 •  डान्सबार बंदीचा धाडसी निर्णय घेतला आणि त्याची यशस्वीरित्या अंमलबजावणीही केली
 • डान्सबार बंदीच्या निर्णयावर अनेक स्तरांमधून टीका झाल्यानंतरही आबा आपल्या निर्णयावर शेवटपर्यंत ठाम राहिले.
 • नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारले. 
 • गडचिरोलीमधील विकासकामांना त्यांच्या प्रयत्नांमुळे चालना मिळाली


गुणवैशिष्ट्ये – 

 • राजकीय पार्श्वभूमी नसताना सामान्य घरातून उपमुख्यमंत्रिपदापर्यंत मजल मारली
 • संवेदनशील राजकीय नेता अशी ओळख असणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक
 • राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे खंदे पाठीराखे
 • राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वच्छ प्रतिमेचा सोज्ज्वळ चेहरा अशी आबांची ओळख होती
 • तीन तपांहून अधिकच्या राजकीय कारकिर्दीत भ्रष्टाचाराचा एकही आरोप त्यांच्यावर झाला नाही
 • ते एक उत्कृष्ट वक्ता होते. त्यांना ग्रामीण महाराष्ट्रीची चांगली माहिती होती


No comments:

Post a Comment

Advertise