आटपाडीत डॉक्टरसह एकूण आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 15, 2020

आटपाडीत डॉक्टरसह एकूण आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

आटपाडीत डॉक्टरसह एकूण आज ६ जण कोरोना पॉझिटिव्ह

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी शहरात ही कोरोनाचे रुग्ण आढळून आले असून यामध्ये आज एका डॉक्टरसह ६ जण कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. 


आटपाडी सागरमळा नं. २ येथील पॉझिटिव्हच्या संपर्कात आलेल्या तिघांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर साई मंदिर परिसरातील एका डॉक्टरचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. व्यापारी पेठेतील अजून एका कापड व्यापाऱ्याचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. 


तर बसस्थानक परिसरातील मेन पेठेतील एका महिलेचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने आज शहरात एकूण ६ जण कोरोनाबाधित आढळून आले आहेत. 


दररोज वाढत असलेल्या कोरोना रूग्णामुळे जर काम असेल तरच घरातून बाहेर पडा, मास्कचा वापर करा व सोशल डिस्टस्निंगचे पालन करण्याचे करण्याचे आवाहन नागरिकांना सरपंच सौ. वृषाली पाटील यांनी केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise