राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले ; या नदीची पाणी पातळी वाढली - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 16, 2020

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले ; या नदीची पाणी पातळी वाढली

राधानगरी धरणाचे तीन दरवाजे खुले ; या नदीची पाणी पातळी वाढली 


कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणाचे तीन स्वयंचलित दरवाजे खुले झाल्याने पंचगंगा नदीचे पाणी पात्रा बाहेर आले असून पुन्हा एकदा कोल्हापूरकरावर पुराचे संकट ओढवले आहे.


कसबा बावडा येथील राजाराम बंधाऱ्याची पंचगंगा नदीची पाणी पातळी चोवीस तासात 6 फुटाने वाढली असून काल हीच पाणी पातळी सकाळच्या सुमारास 27 फुटावर होती तर आज सकाळी 33 फुट झाली आहे. 


जिल्ह्यात दोन दिवसांपासून मुसळधार तर पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी होत असल्याने पूराचे पाणी झपाट्याने वाढत आहे. सकाळी अकरापर्यंत जिल्ह्यात 35 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 


राधानगरी धरणाचे तीन  दरवाजे उघडले आहेत. त्यामुळे पाणी पातळी आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाल्याने नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise