शेतकऱ्यांच्याकडून शरद पवारांचा असाही ही सन्मान ; बैलपोळ्यानिमित्त बैलाचे अंगावर शरद पवारांचे पेंटिंग्ज - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 19, 2020

शेतकऱ्यांच्याकडून शरद पवारांचा असाही ही सन्मान ; बैलपोळ्यानिमित्त बैलाचे अंगावर शरद पवारांचे पेंटिंग्ज


शेतकऱ्यांच्याकडून शरद पवारांचा असाही ही सन्मान ;  बैलपोळ्यानिमित्त बैलाचे अंगावर शरद पवारांचे पेंटिंग्ज

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी : काल राज्यात सगळीकडे शेतकऱ्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव असताना सुद्धा बैलपोळा मोठ्या प्रमाणत साजरा केला. विशेषतः हा सन विदर्भात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो. या दिवशी आपला बळीराजा त्याच्या बैलांची पूजा करतो.पोळा हा श्रावण महिन्यातील पितोरी अमावास्येला येतो, इंग्रजी महिन्यांनुसार हा सन ऑगस्ट महिन्यात येतो.


परंतु मालेगाव तालूक्यातील एका शेतकऱ्याने मात्र बैलपोळा हा वेगळ्याच प्रकारे साजरा केला. देशाचे माजी कृषीमंत्री शरद यांचे पेंटींग चक्क बैलाच्या अंगावर काढत यांनी एकप्रकारे त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली आहे.


सदरचे चित्र सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.चंद्रकांत शिंपी यांनी त्यांच्या ट्वीटर अकाऊंट वरून शेअर केली आहे. याची संकल्पना मयूर अमृत निकम यांची असून सदरचे चित्र हे चित्रकार राम निकम यांनी रेखाटले असून नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दाभाडी गावचे हे शेतकरी आहेत. 

Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise