Type Here to Get Search Results !

जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात त्यांना पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले : सतेज पाटील

जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात त्यांना पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले : सतेज पाटील 

___________________________________________________________________________


ते साखर कारखाना अभ्यास समितीच्य पदी आहेत. पण ज्यांच्या स्वतःच्या कारखान्यावर ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे


कोल्हापूर : जे माझ्या निष्क्रियतेबद्धल बोलतात ते किती सक्रिय होते हे पावणेतीन लाख मतांनी पराभव करून कोल्हापूरच्या जनतेने दाखवून दिले आहे असा टोलाही त्यांनी भाजप नेते व माजी खासदार धनंजय महाडिक यांना लगावला.


युवक काँग्रेसने महाडिक यांच्या दारात शुक्रवारी आंदोलन केल्यानंतर त्यांनी पालकमंत्री पाटील यांच्यावर जोरदार टीका केली होती. कोरोनाचे संकट थोपवण्यात अयशस्वी ठरलेल्या निष्क्रिय पालकमंत्र्यांना बदलून त्याऐवजी कामाची धडाडी असलेल्या हसन मुश्रीफ यांना पालकमंत्री करावे असे ते म्हणाले होते. त्यास पालकमंत्री पाटील यांनी रविवारी पत्रकार परिषदेत प्रत्युत्तर दिले.


सतेज पाटील म्हणाले, युवक काँग्रेसचे आंदोलन राज्यव्यापी होते. ते महाडिक यांच्यासह भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या दारातही करण्यात आले पण त्यांनी कोणतीच प्रतिक्रिया दिली नाही. महाडिक मात्र संतापले कारण आपल्यावर भाजपचा शिक्का बसला तर अन्य पक्षात जाण्याचे दरवाजे बंद होतील अशी भीती त्यांना वाटते. त्यामुळे पालकमंत्री बदलणे म्हणजे पेट्रोल पंपावरील माणूस बद्दलण्याइतके सोपे आहे का? असे ते म्हणाले. 


ते साखर कारखाना अभ्यास समितीच्य पदी आहेत. पण ज्यांच्या स्वतःच्या कारखान्यावर ३०० कोटींच्या कर्जाचा डोंगर आहे व जो कारखाना तीन हंगाम घेऊ शकलेला नाही अशा कारखान्याचे प्रमुख इतर कारखान्याचे प्रश्न काय मांडणार अशी खिल्ली ही पालकमंत्री पाटील यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांची उडवली.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज



टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies