करण जोहरची पद्मश्री काढून घ्या ; या अभिनेत्रीने केली मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

करण जोहरची पद्मश्री काढून घ्या ; या अभिनेत्रीने केली मागणी

 

करण जोहरची 'पद्मश्री' काढून घ्या ;  या अभिनेत्रीने केली मागणी 


मुंबई : 'मी भारत सरकारला विनंती करते की, त्यांनी करण जोहरचा पद्मश्री पुरस्कार काढून घ्यावा' एका आंतरराष्ट्रीय व्यासपीठावरून बोलताना त्याने मला बिनदिक्कतपणे ही इंडस्ट्री सोडून जाण्याविषयी वक्तव्य केलं होतं. उरी वेळीही त्याने पाकिस्तानला पाठिंबा दिला होता. त्याने सुशांतचं करिअरही संपवलं आणि आता तर त्याने भारतीय सैन्यावर देशद्रोही चित्रपट बनवला आहे, असं विधान अभिनेत्री कंगना राणावत हिने ट्विटर अकाऊंटवरून केलं आहे.


सुशांतसिंह राजपूतच्या मृत्यूनंतर कंगना राणावत हिने करण जोहर, आदित्य चोप्रा, महेश भट्ट यांच्याविरोधात जोरदार आघाडी उघडली आहे. करणने सुशांतचं करिअर कसं संपवलं याचं दाखले ती देते आहे. आता गुंजन सक्सेना या चित्रपटाच्या निमित्ताने उद्भवत असलेल्या वादांमधूनही तिने करणला जोहरला धारेवर धरायला सुरूवात केली आहे. 


Join WhtasApp Free माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise