उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली’ - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 2, 2020

उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली’

उद्धव ठाकरे बॉलिवूड माफियांच्या दबावाखाली’

मुंबई : बिहारचे उपमुख्यमंत्री सुशीलकुमार मोदी यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर आरोप केले आहेत. उद्धव ठाकरे यांच्यावर बॉलिवूडमधील माफियांचा दबाव असल्याचा खळबळजनक आरोप त्यांनी केला आहे. 


सुशांत सिंह राजपूत मृत्यूप्रकरणाच्या तपासासाठी काही दिवसांपूर्वीच बिहार पोलिसांचे एक पथक मुंबईत दाखल झाले होते. तेव्हापासून मुंबई आणि बिहार पोलीस वारंवार आमनेसामने येताना दिसत आहेत. गृहराज्यमंत्री शंभुराज देसाई यांनी बिहार पोलिसांना महाराष्ट्रात तपासाची परवानगी देण्यात आली नसल्याचे स्पष्ट केले होते. या पार्श्वभूमीवर सुशीलकुमार मोदी यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. बिहारचा मुलगा सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्युच्या चौकशीसाठी आलेल्या बिहार पोलिसांना मुंबई पोलिसांचे सहकार्य मिळत नाही.
उद्धव ठाकरे यांच्यावर काँग्रेसचा वरदहस्त असलेल्या बॉलिवूड माफियांचा दबाव आहे. त्यामुळे सुशांत प्रकरणात जबाबदार असणाऱ्या सर्व घटकांना वाचवण्याचा जोरदार प्रयत्न करण्यात येत आहे. काँग्रेस बिहारच्या जनतेला काँग्रेस काय तोंड दाखवेल?, असे टिवट सुशील मोदी यांनी केले आहे. 


No comments:

Post a Comment

Advertise