जत तालुक्यातील युवकाची आत्महत्या - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 3, 2020

जत तालुक्यातील युवकाची आत्महत्या


जत तालुक्यातील युवकाची आत्महत्या 


जत : जत तालुक्यातील बालगाव येथील 27 वर्षे तरूणाने राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.


प्रकाश बिळेनी माने  (वय 29 रा.बालगाव) असे गळफास लावून आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. सदरचा तरुण हा पुणे येथे खाजगी नोकरीस होता. लॉकडाऊन असल्याने तीन महिने झाले तो बालगाव येथील घरीच वडील बिळेनी सोबत राहत होता. 


सोमवारी घरात कोणी नसल्याने त्याने राहत्या घरी गळफास लावून घेतला. उमदी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी उमदी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सदरचा मृतदेह पाठविला असून घटनेबाबत अधिक तपास उमदी पोलीस करत आहेत.


No comments:

Post a Comment

Advertise