आटपाडीत २०० खाटांचे रुग्णालय सुरु करा : सादिक खाटीक यांची जयंत पाटील, राजेश टोपेंकडे मागणी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 17, 2020

आटपाडीत २०० खाटांचे रुग्णालय सुरु करा : सादिक खाटीक यांची जयंत पाटील, राजेश टोपेंकडे मागणी

आटपाडीत २०० खाटांचे रुग्णालय सुरु करा : सादिक खाटीक यांची जयंत पाटील, राजेश टोपेंकडे मागणी


आटपाडी दि . १७  (प्रतिनिधी) : आटपाडी तालुक्यातील कोरोणा रुग्णांसाठी आटपाडी येथे, गंभीर रुग्णांसाठी अतिदक्षता विभागाच्या ५० खाटांचे आणि इतर रुग्णांसाठी १५० अतिरिक्त खाटांचे असे २०० खाटांचे  रुग्णालय तातडीने उभे करा, अशी महत्वपूर्ण मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य सादिक खाटीक आटपाडी यांनी राज्याचे जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्हयाचे पालकमंत्री जयंतराव पाटील आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे, आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांना पाठविलेल्या ईमेल निवेदनाद्वारे केली आहे. 


आटपाडी तालुक्यातील कोविड-१९ च्या संदर्भात आजची परिस्थिती लक्षात घेता २६४  बाधीत  रुग्णांची संख्या झाली आहे. दररोज किमान १५ ते २० रूग्ण मिळून येत आहेत. बरेच रुग्ण आता गंभीर अवस्थेमध्ये रुग्णालयात येत आहेत.आज आटपाडी तालुक्यातील आरोग्य यंत्रणा उत्तम काम करीत असुनही नजीकच्या काळात ही व्यवस्था कमी पडणार आहे.


आटपाडी तालुक्यातील कोविड-१९ चे रुग्ण अपुऱ्या सुविधांमुळे मिरज येथे संदर्भित करण्यात येत आहेत. आटपाडी येथेच काही गोष्टींमध्ये सुधारणा केलेस अनेक लोकांना त्याचा लाभ होणार आहे. आटपाडी मध्ये १५० खाटांची अतिरिक्त व्यवस्था करण्याची गरज वाटत आहे. सध्या असलेली खाटांची संख्या अपुरी पडत आहे. लक्षणे नसलेल्या रुग्णांना घरीच उपचार दिले जात आहेत. सौम्य व मध्यम लक्षणाच्या रुग्णांसाठी अतिरिक्त सोय करणे गरजेचे आहे. गंभीर रुग्णांसाठी ५० खाटांच्या अतिदक्षता विभागाची सोय करणे गरजेचे आहे. १० खाटांसाठी ची ventilater ची सोय करणे आवश्यक आहे.


Covid रुग्णांच्या निदानासाठी डिजिटल x-ray ची सोय आवश्यक आहे. रक्त व लघवी तपासणीसाठी cell counter, biochemistry analysen,  urine analyser ची गरज आहे.  दोन Advanced cardiar ambulance  ची अत्यंत आवश्यकता असून ७५ Bed side monitor ची आवश्यकता आहे. येथे Central oxygen व मोठे oxygen cylinder ची आवश्यकता आहे. तसेच २५ High flow oxygenmeter ची आवश्यकता आहे. दहा Computer printers गरजेचे आहेत. सध्या एकच  MD Doctor कार्यरत आहेत.अजुन ४ ते ५  M D डॉक्टरांची आवश्यकता आहे ते तातडीने उपलब्ध करून दिले जावेत.


 तसेच नवीन जुन्या खाटांच्या च्या प्रमाणात staff व इतर  साहित्याची अति आवश्यकता असून या सर्व बाबी अत्यंत महत्वाच्या असून आपल्या महाआघाडी सरकारच्या माध्यमातून त्या तातडीने उपलब्ध करून दिल्या जाव्यात अशी अपेक्षा ही सादिक खाटीक यांनी शेवटी व्यक्त केली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise