शिवाजी क्रीडांगण की ‘स्विमिंग पूल’, शासनाच्या कोट्यावधी पैशांचा चुराडा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 14, 2020

शिवाजी क्रीडांगण की ‘स्विमिंग पूल’, शासनाच्या कोट्यावधी पैशांचा चुराडा


शिवाजी क्रीडांगण की ‘स्विमिंग पूल’, शासनाच्या कोट्यावधी पैशांचा चुराडा

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : मिरज येथील कोट्यावधी रुपये खर्चूनही (Shivaji Stadium) शिवाजी स्टेडियमचे दुरवस्था तशीच आहे सध्याच्या पावसामुळे त्याचे ‘स्विमिंग पूल’ झाले आहे व महानगरपालिकेच्या याबाबतच्या निकृष्ट कामाची यामुळे पोल खोल झाली आहे. नागरिकांच्या करातून शासनाने दिलेला या पैशांचा चुराडा झाला आहे व या कामांबाबत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे दिसून येत आहे. 


छत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाने राजकीय नेते मतांचा जोगवा मागून राजकारण करत सत्तेवर बसलेत. पण संबंधित खासदार, आमदार, नगरसेवक या स्टेडियम दुरवस्थेबाबत चकार शब्द देखील काढत नाहीत. मनपा आयुक्त व मनपा प्रशासनाने याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केल्याने त्यांची जातीवादी भूमिका यातून दिसून येत असून  महापुरुषांचा नावाचा अपमान कदापीही आम्ही खपवून घेणार नाही.


 येत्या १५ दिवसात जिल्हाधिकारी व आयुक्तांनी यावर कारवाई करावी अन्यथा महानगरपालिकावर “गाढव मोर्चा’ काढण्याचा इशारा रिपब्लिकन स्टुडंट फोरमचे प्रमुख अमोल वेटम, ऑल इंडिया पँथर सेना जिल्हा उपाध्यक्ष मानतेश कांबळे, गौतम भगत, परशुराम शिंगे, कृष्णा दहीवडे, जितेंद्र कांबळे, रवी नाटेकर, अण्णासाहेब कांबळे आदींनी दिला आहे. 


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise