वसंतदादा कारखान्याकडून १०० खाटांच्या कोव्हीड रुग्णालयासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव : विशाल पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 12, 2020

वसंतदादा कारखान्याकडून १०० खाटांच्या कोव्हीड रुग्णालयासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव : विशाल पाटील

विशाल पाटील सांगली

वसंतदादा कारखान्याकडून १०० खाटांच्या कोव्हीड रुग्णालयासाठी प्रशासनाकडे प्रस्ताव : विशाल पाटील

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : वसंतदादा शेतकरी साखर कारखान्यामार्फत, १०० खाटांच्या कोविड रुग्णालयासाठी महापालिका व जिल्हा प्रशासनाकडे प्रस्ताव सादर केला असल्याची माहिती कारखान्याचे अध्यक्ष विशाल पाटील (Factory President Vishal Patil) यांनी दिली.


यावेळी बोलताना विशाल पाटील (Vishal Patil म्हणाले, कारखाना कार्यस्थळावर असलेल्या जागेवर तातडीने हे हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे. कोरोनाचे संकट अत्यंत मोठे आहे. शासनाच्या यंत्रणेला कोरोनाशी लढताना काही मर्यादा येत आहेत. यासाठी शरद पवार (Sharad Pawar) यांनी राज्यातील साखर कारखान्यांना आवाहन करुन तातडीने कोविड हॉस्पीटल उभा करण्यास सांगितले आहे. (Vasantdada's family has always been at the forefront of the public interest) वसंतदादांचे कुटुंबिय नेहमीच जनतेच्या हितासाठी अग्रेसर राहिले आहेत. कारखान्याच्या माध्यमातून अनेक समाजोपयोगी कामे यापूर्वी झालेले आहेत. कोरोना काळात पहिल्या टप्प्यातच (The Vasantdada factory produced sanitizers and distributed them free of cost in many villages) वसंतदादा कारखान्याने सॅनिटायझरचे उत्पादन करुन ते अनेक गावांमध्ये मोफत वाटप केले होते.  


नंतर ते अल्पदरात नागरिकांसाठी उपलब्ध करुन देण्यात आले. (Vasantdada factory space was made available for isolation and quarantine.) आयसोलेशन व क्वारंनटाईनसाठी वसंतदादा कारखान्याची जागा उपलब्ध करुन देण्यात आली होती.


सांगली जिल्ह्यात तसेच सांगली महापालिका क्षेत्रात वाढणारा कोरोना संसर्ग लक्षात घेऊन कारखाना कार्यस्थळावर तातडीने शंभर खाटांचे कोविड हॉस्पिटल उभा करण्याची आमची तयारी आहे. यासाठी आम्ही महापालिका आयुक्त नितीन कापडणीस (Municipal Commissioner Nitin Kapdanis) यांना तसा प्रस्ताव दिला आहे.  


तर सभासदांच्यावतीने जिल्हाधिकारी अभिजीत चौधरी (Collector Abhijeet Chaudhary) यांच्याकडेही प्रस्ताव सादर करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी जागेची पाहणी केलेली आहे. शासनामार्फत हे रुग्णालय चालवावे किंवा त्यांची अडचण असल्यास आम्हीही हे रुग्णालय चालविण्याची तयारी दर्शविली आहे. ऑक्सिजन पुरवठ्यासहीत हे कोव्हीड रुग्णालय करण्याचा आमचा प्रस्ताव असून तो तातडीने मंजूर केल्यास रुग्णांची चांगली सोय होईल, असा विश्वाहस विशाल पाटील (Vishal Patil) यांनी व्यक्त केला आहे.


No comments:

Post a Comment

Advertise