पंढपुरात “प्रकाश आंबेडकरांचे” आंदोलन सुरु ; मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Monday, August 31, 2020

पंढपुरात “प्रकाश आंबेडकरांचे” आंदोलन सुरु ; मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्तपंढपुरात “प्रकाश आंबेडकरांचे” आंदोलन सुरु ; मंदिर परिसरात पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त


पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी मंदिरं खुली करण्यासाठी आज पंढरपुरच्या विठ्ठल मंदिरात आंदोलनास सुरुवात केली आहे. या आंदोलनाचा धसका राज्य सरकारने घेतला असून हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे.


विश्व वारकरी सेवा आणि वंचितचे कार्यकर्त्यांनी आज सकाळी विठ्ठल मंदिर उघडलं होत. तर आंदोलनासाठी प्रकाश आंबेडकर सोलापूरहून पंढरपूरात दाखल झाले आहेत. या दरम्यान मंदिर परिसरात कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.


आंदोलनाला वाढता वारकऱ्यांचा पाठींबा पाहता, सरकारने आता या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांचा निरोप घेवून जिल्हाधिकारी पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. वंचितच्या पदाधिकाऱ्यांसोबत प्रशासनाची बैठक सुरु आहे. त्यामुळे या बैठकीत आता काय तोडगा निघतो? मंदिरे खुली होणार आहेत का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.


No comments:

Post a Comment

Advertise