Type Here to Get Search Results !

आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदिस्त ; मंदिराकडे जाणरे सर्व मार्ग केले बंद



आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपूरमध्ये पोलिसांचा कडेकोट बंदिस्त ; मंदिराकडे जाणरे सर्व मार्ग केले बंद

माणदेश एक्सप्रेस न्युज


पंढरपूर : वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख बाळासाहेब आंबेडकर हे दिनांक १ रोजी पंढरपूर येथे मंदिर सुरु करण्यासाठी आंदोलन करणार असल्याने पोलिसांनी मंदिर परीसरामध्ये मोठा बंदोबस्त तैनात केला असून मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद करण्याचे काम सुरु आहे.


बाळासाहेब आंबेडकर यांनी राज्यातील मंदिरे सरकारने सुरु करावीत या मागणीसाठी वारकरी पंढरपूरमध्ये आंदोलन करणार असून या आंदोलनाला वंचित च्या बाळासाहेब आंबेडकर यांनी पाठींबा दिला असल्याने या आंदोलनाची दखल प्रशासनाने घेतली आहे.  


पोलिसांनी विठ्ठल मंदिराकडे जाण्याचे सर्व मार्ग बंद केले आहेत. गेली दोन दिवस झाले शहरामध्ये एस.टी. वाहतूक ही बंद करण्यात आली आहे. कुठल्याही पद्धतीने आंदोलक पंढरपूर येथे पोहचू नये यासाठी खबरदारी घेतली जात आहे.  


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies