पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 13, 2020

पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी

 


पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी


मुंबई : मावळ लोकसभेचे उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पूत्र (Partha Pawar) पार्थ पवार हे सिल्व्हर ओक बंगल्यावर (Supriya Sule) सुप्रिया सुळे यांची भेटीसाठी गेल्याने चर्चेला उधाण आले आहे. (Sharad Pawar) शरद पवार यांनी केलेल्या वक्तव्यामुळे पार्थ पवार नाराज असल्याचे समजते.

(Partha Pawar) पार्थ पवार हे अपरिपक्व आहेत, त्यांच्या मताला काडीची किंमत नाही, असं वक्तव्य शरद पवार यांनी काल केलं होतं. (Sharad Pawar) शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बैठकांची मालिका सुरू झाली. शरद पवार यांच्या या वक्तव्यानंतर काल लगेचच सिल्व्हर ओकवर (Sharad Pawar) शरद पवार,  (Ajit Pawar) अजित पवार, (Supriya Sule) सुप्रिया सुळे आणि प्रदेशाध्यक्ष (Jyant Patil) जयंत पाटील यांच्यात बैठक झाली.


काल झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमधूनही (Ajit Pawar) अजित पवार मध्येच निघून गेले, त्यामुळेही अनेक चर्चा सुरू झाल्या. पण मंत्रिमंडळाची बैठक लांबल्यामुळे आणि अजित पवारांचं पूर्वनियोजित काम असल्यामुळे मुख्यमंत्र्यांची परवानगी घेऊन अजित पवार मंत्रिमंडळ बैठकीतून निघाल्याचं जयंत पाटील यांनी सांगितलं.


दरम्यान आज दुपारीही सुप्रिया सुळे यांनी मंत्रालयात जाऊन अजित पवार यांची भेट घेतली. जवळपास १० मिनिटं या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली. मतदारसंघाच्या कामासाठी सुप्रिया सुळे अजित पवारांना भेटल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात आलं. शरद पवार यांनी पार्थ पवार यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर अजित पवार, पार्थ पवार किंवा सुप्रिया सुळे यांच्यापैकी कोणीच प्रतिक्रिया दिलेली नाही.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise