पळसावडेतील टाटा सोलर पॉवर च्या विरोधात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 23, 2020

पळसावडेतील टाटा सोलर पॉवर च्या विरोधात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न


पळसावडेतील टाटा सोलर पॉवर च्या विरोधात एकाचा आत्मदहनाचा प्रयत्न

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : पळसावडेतील अनिल बबन शेळके याने टाटा पावर गेट समोर कंपनीकडून झालेल्या  फसवणुकीच्या निषेधार्थ पुन्हा कामावर घेण्यासाठी रॉकेल ओतून आत्मदहन करण्याचा प्रयत्न केला आहे.


अधिक माहिती अशी, (Palsavade Ta. Maan, Dist. Satara Tata Power Solar) पळसावडे ता. माण, जि. सातारा येथील ग्रामस्थ टाटा पावर सोलर कडून फसवणूक झाल्याप्रकरणी उपोषणाला बसलेले होते. टाटा पावर या कंपनीने माण तालुक्यातील देवापुर,शिरताव व पळसावडे गावाच्या जवळ सोलर वीज निर्मिती प्रकल्प सुरू केलेला आहे. हा प्रकल्प सुरू करताना आसपासच्या शेतकऱ्यांनी रस्ता अडवलेला होता.  


तेव्हा काही शेतकऱ्यांनी आपल्या रानातून रस्ता काढून दिला. त्यावेळी टाटा सोलर कंपनीने रस्ता देणाऱ्या शेतकऱ्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्याची हमी दिलेली  होती. त्यानुसार काही शेतकऱ्यांना नोकऱ्या दिल्या मात्र पळसावडे तालुका माण येथील अनिल बबन शेळके या तरुणांना सेक्युरिटी गार्ड मध्ये काम देण्यात आलं व लगेचच त्याला सहा महिन्यात कामावरून काढण्यात आलेला आहे. आणि या तरुणाची फसवणूक केली.

याबाबत (Anil Baban Shelke) अनिल बबन शेळके याने (Tehsildar of Man) माणच्या तहसीलदारांना दिल्याने त्यांनी  (Palsavade Ta. Maan, Dist. Satara Tata Power Solarटाटा सोलर कंपनी च्या विरोधात फसवणूक केल्याप्रकरणी कंपनीच्या कार्यालयाच्या समोर शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केलेले होते. यामध्ये अनिल शेळके, बबन शेळके, लक्ष्मण काळे, भानुदास धुळे हे शेतकरी उपोषणाला बसलेले होते.  


यावेळी सांयकाळी अनिल शेळके यांनी अंगावर रॉकेल ओतून आत्महत्या प्रयत्न केला. आसपासच्या लोकांनी यावेळी तातडीने रॉकेलचा कॅन हिसकावून घेतला आणि त्याला वाचविले. एक महिन्याच्या आत कामावर घेण्याचे तोंडी आश्वासन कंपनी च्या वतीने देण्यात आले असल्याने सांगण्यात येत आहे. यानंतर हे उपोषण स्थगित करण्यात आले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise