डरने वाले बाप का… डरा हुआ बेटा, नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 27, 2020

डरने वाले बाप का… डरा हुआ बेटा, नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका


 
डरने वाले बाप का… डरा हुआ बेटा, नितेश राणेंची आदित्य ठाकरेंवर टीका

माणदेश एक्सप्रेस ऑनलाईन टीम


आटपाडी : डरने वाले बाप का… डरा हुआ बेटा. असे ट्वीट करीत आमदार भाजपचे आमदार नितेश राणें यांनी मंत्री आदित्य ठाकरेंवर जोरदार टीका केली आहे.


काँग्रेस च्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्या नेतृत्वात देशभरातील विरोधी पक्षाच्या सात मुख्यमंत्र्यांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक नुकतीच झाली. या बैठकीत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कॅबिनेट बैठक असल्यामुळे आधी बोलू द्या, अशी विनंती सोनिया गांधी यांनी केली.  


उद्धव यांनी प्रांजळपणे ममतादीदींना परवानगी मागितली असता, उद्धवजी आप बहुत अच्छा फाईट कर रहे है, अशी स्तुती त्यांनी केली होती. तेव्हा उद्धव ठाकरे ‘लढनेवाले बाप का लढनेवाला बेटा हूं’, असे अभिमानाने म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री व मंत्री आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली आहे.


डरने वाले बाप का, डरा हुआ बेटा हूं, असे म्हणत नितेश राणे यांनी शिवसेनेचे युवा नेते आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. याआधीही अभिनेता सुशांतसिंह राजपुतच्या मृत्यू प्रकरणावरून नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे आणि शिवसेना यांच्यावर टीका केली आहे. टीका करत असताना त्यांनी रिया चक्रवर्तीला आदित्य ठाकरेंचे नाव का घ्यावसे वाटले, असा सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise