Type Here to Get Search Results !

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घरवापसी मोहीम जोरात

 

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घरवापसी मोहीम जोरात

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : लोकसभा व विधानसभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस मधून गेलेल्या गयाराम नेत्यांची लवकरच घर वापसी होणार असल्याची चर्चा सध्या राजकारणात जोर धरू लागली आहे.


कोणत्याही राजकीय पक्षाला आयाराम गयाराम यांचा मोठा फटका बसत असतो. खास करून निवडणुकीच्या तोंडावर याचा सर्वात मोठा फटका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बसला. राष्ट्रवादी मधून भाजप मध्ये गेलेल्या नेत्यांची संख्या मोठी होती. परंतु या नेत्यांच्या राजकीय आकांक्षा वर राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी पाणी फिरवल्याने पुन्हा या नेत्यांची घरवापसी होणार आहे


राष्ट्रवादी कॉंग्रेस मध्ये भाजपच्या आमदारांचा प्रवेश होणार असल्याची चर्चा सध्या जोर धरू लागली असून याची सर्वस्वी जबाबदारी पक्षाने प्रदेशाध्यक्ष व जलसंपदा मंत्री जयंत पाटील व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर सोपविली आहे.


राष्ट्रवादी काँग्रेस सोडून गेलेल्या नेत्यांमध्ये प्रमुख्याने खासदार उदयनराजे भोसले, माजी खासदार धनंजय महाडिक, आमदार शिवेंद्रराजे भोसले, माजी मंत्री गणेश नाईक, माजी मंत्री बबनराव पाचपुते, राणाजगजितसिंह पाटील, आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्या नावाचा प्रमुख्याने समावेश आहे.


जर या नेत्यांनी पुन्हा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला तर सध्याची राजकीय परिस्थिती बदलणार असून त्याची मोठी किंमत भाजपला मोजावी लागणार आहे.


परंतु सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ याबाबत प्रतिक्रिया देताना म्हणाले, पक्षात यायचे असेल तर त्यांचे स्वागतच आहे परंतु त्यांना राजीनामा देऊन पक्षात यावे लागेल. भविष्यात जर या नेत्यांची घरवापसी झाली तर राज्यातील राजकीय समीकरण बदललेली दिसणार आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies