राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 30, 2020

राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह

 


राष्ट्रवादीचे जुन्नरचे आमदार कोरोना पॉझिटिव्ह


पुणे : राष्ट्रवादीचे पुणे जिल्ह्यातील जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना कोरोनाची लागण झाली आहे.  27 तारखेला त्यांना त्रास जाणवू लागल्याने काळजी म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली. त्या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने मी हॉस्पिटलमध्ये अॅोडमिट आहे, अशी माहिती त्यांनी ट्वीटर द्वारे दिली आहे.


कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने मागील काही दिवसांत ज्या व्यक्ती व सहकारी माझ्या संपर्कात आले आहेत त्यांनी काळजी म्हणून स्वतःची चाचणी करून घ्यावी, असं आवाहन देखील अतुल बेनके यांनी केले आहे.

हे ही वाचा : टेंभुर्णी नजीक हायवेवर ट्रक अडवून दरोडा टाकणारे ५ दरोडेखोर अटकेत ; टेंभुर्णी पोलिसांची कारवाई


No comments:

Post a Comment

Advertise