Type Here to Get Search Results !

आमदार पुत्राच्या कोरोना मुक्तीसाठी दुग्धाभिषेक व महापूजा

 

आमदार पुत्राच्या कोरोना मुक्तीसाठी दुग्धाभिषेक व महापूजा


उस्मानाबाद : आमदार पुत्र कोरोनामुक्त व्हावा यासाठी देवीचा दुग्धाभिषेक व महापूजा केली जात आहे. 


तुळजापूरचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचा नुकताच कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला. फेसबुकच्या माध्यमातून मल्हार पाटील यांनी ही माहिती दिली होती. मल्हार पाटील कोरोना मुक्त व्हावे यासाठी कार्यकर्त्यांनी देवीला दुधाचा अभिषेक करून पूजा केली.


मल्हार पाटील यांची फेसबुक पोस्ट

कोरोना चाचणीप्रमाणे माझा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. मी सध्या तेरणा हॉस्पिटल नवी मुंबई येथील कोव्हीड सेंटर येथे दाखल झालो असून येथे उपचार घेत आहे आमदार राणादादांच्या स्टाफ मधील ८ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर घरातील सर्वांची चाचणी केली असता आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने अहवाल निगेटीव्ह आले आहेत. माझी देखील तपासणी केली असून माझा अहवाल मात्र पॉझिटिव्ह आला असल्याचे त्यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies