म्हसवडकरांचा उद्या पासून बंदचा निर्णय - mandeshexpress.com

Latest

Advertise

Sunday, August 23, 2020

म्हसवडकरांचा उद्या पासून बंदचा निर्णय


म्हसवडकरांचा उद्या पासून बंदचा निर्णय  

माणदेश एक्सप्रेस न्युज


म्हसवड/अहमद मुल्ला : म्हसवड शहरातील कोरोनाची साखळी तुटण्याचे नावच घेत नसुन एक दिवसाच्या विश्रांती नंतर शनिवारी पुन्हा शहरात १३ नवीन कोरोनाचे रुग्ण सापडले असुन यामध्ये ८ पुरुष तर ५ महिलांचा समावेश आहे.


शहरातील कोरोना रुग्णांची वाढती आकडेवारी मुळे म्हसवडकर नागरीक भयभित झाले असुन कोरोनाची ही साखळी कधी थांबणार असा सवाल म्हसवडकर जनता आता विचारु लागली आहे.  


शहरात वाढणारा कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शनिवार दि. २२ रोजी पालिका नगरसेवकांनी एकत्र येत शहरवासीयांना सोमवार दि. २४ पासुन ५ दिवस कडकडीत बंद पाळण्याचे आवाहन केले असुन जनतेनेही त्यांच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देण्याचे मान्य केले आहे.


पालिकेकडुन शहरात निर्जंतुकीकरणाची फवारणी

शहरात दररोज वाढणाऱ्या कोरोना बाधितांची संख्या रोखण्यासाठी म्हसवड पालिकेने खबरदारी म्हणुन संपुर्ण शहरात निर्जंतुकीकरणाची मोहिम सुरु केली असुन पालिकेच्या अग्निशमन द्वारे शहरातील मुख्य बाजारपेठेत फवारणी सुरु केली आहे, तर छोट्या गल्ल्यांमध्ये छोट्या वाहना द्वारे फॉगींग सुरु केले आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज 


No comments:

Post a Comment

Advertise