Type Here to Get Search Results !

मंगळवेढा तालुक्याचे नेते चरणुकाका पाटील यांचे निधन


मंगळवेढा तालुक्याचे नेते चरणुकाका पाटील यांचे निधन 

माणदेश एक्सप्रेस न्युज


सोलापूर : मंगळवेढा तालुक्याचे जेष्ठ नेते चरणुकाका पाटील यांचे निधन गुरुवारी पहाटे २ वाजता रुग्णालयात उपचार घेत असताना दुख:द निधन झाले.


ब्रह्मपुरी येथील शेतकरी कुटुंबातील चरणूकाका पाटील यांनी भीमा साखर कारखानाची १५ वर्ष यशस्वीपणे धुरा सांभाळली. भीमा नदी काठी ऊसाचे मोठे क्षेत्र पाहता व मंगळवेढा तालुक्यातील शेतकऱ्यांचा ऊस वेळेत गाळप होऊन त्यांच्या ऊसाला योग्य भाव मिळावा यासाठी त्यांनी तालुक्यात दामाजी साखर कारखाना उभारणीसाठी मोलाचे योगदान दिले.


जेष्ठ नेते माजी आमदार किसनलाल मर्दा व रतनचंद शहा या दोन जेष्ठ नेत्यांना शेतकऱ्यांच्या हितासाठी एकत्रित आणून दामाजी साखर उभारणीसाठी महत्वाचा दुवा साधला.


त्यांनी संचालकपद, व्हा चेअरमन, चेअरमन ही सर्व पदे यशस्वीपणे सांभाळली त्यांनी आपल्या कार्यकाळात शेतकरी व कामगार केंद्रबिंदू मानून कारखान्याचा कारभार पहिला.


ब्रह्मपुरी गावास तालुक्याचे सत्ता केंद्र म्हणून नावारूपाला आणले होते ते गेल्या महिन्यांपासून किडनीच्या आजारासाठी सोलापूर येथील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. गुरुवारी रात्री दोन वाजता त्याची प्राणज्योत मालवली, त्यांच्या पश्चात पत्नी, दोन विविहित मुले, एक विविहित मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनाने तालुक्यात शोककळा पसरली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies