या खासदार कोरोनामुक्त होवून पुन्हा कोरोनाग्रस्त - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

या खासदार कोरोनामुक्त होवून पुन्हा कोरोनाग्रस्त

 या खासदार कोरोनामुक्त होवून पुन्हा कोरोनाग्रस्त 


मुंबई : अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि त्यांचे पती आमदार रवी राणा यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. नवनीत राणा यांच्या तब्येतीत शनिवारी सुधारणा झाली. त्यांना अतिदक्षता विभागामधून बाहेर हलवले होते.


त्यानंतर प्रकृती सुधारल्याने रवी राणा शनिवारी रात्री उशिरास आणि नवनीत राणा यांना रविवारी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होता. मात्र आता मुंबई महापालिकेनं नवनीत राणा यांच्यासह रवी राणा यांची कोरोनाची चाचणी केली असता दोघांचेही अहवाल पॉझिटिव्ह आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. 


त्यामुळे मुंबई महापालिकेने दोघांनाही होम क्वारंटाईन राहण्यास सांगतिले आहे. त्यानंतर त्यांनी मुंबईत होम क्वारंटाईन राहण्याचा निर्णय घेतला आहे.No comments:

Post a Comment

Advertise