Type Here to Get Search Results !

मनसे प्रमुख राज ठाकरे दिसले नव्या लुक मध्ये



मनसे प्रमुख राज ठाकरे दिसले नव्या लुक मध्ये  


मुंबई: कोरोनामुळे लागू करण्यात आलेल्या या लॉकडाऊनमध्ये अनेकांनी नवनवीन लूक आजमावून पाहिले. यामध्ये बॉलिवूड कलाकारांसह मराठी कलाकार आणि राजकीय नेत्यांचा देखील समावेश आहे. मात्र यामध्ये आता मनसेप्रमुखराज ठाकरे यांची देखील भर पडली आहे.


सध्या सोशल मीडियावरराज ठाकरे यांना नवा लूक मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. तसेच तरुणांमध्ये राज ठाकरे यांची अधिक क्रेज आहे. त्यामुळे राज ठाकरेंचा हा नवीन लूक तरुणांना आवडल्याचे देखील त्यांच्या फोटोखालील प्रतिक्रियेतून दिसून येत आहे.  


राज ठाकरे महाराष्ट्राला तसे पांढऱ्या रंगाच्या कुर्त्यामध्ये अनेकदा दिसतात. पण या फोटोमध्ये ते जिन्स आणि टिशर्टमध्ये दिसत आहेत. त्याचप्रमाणे राज ठाकरेंनी दाढी वाढवल्याचे देखील दिसून येत आहे. कधीतरी दाढी ठेवणारे राज ठाकरे अचानक दाढीच्या लूकमध्ये दिसून आल्यानं सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगली आहे.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies