दुधदर वाढीसाठी गाईला दुधाची आंघोळ : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन - mandeshexpress.com

Latest

Advertise

Saturday, August 1, 2020

दुधदर वाढीसाठी गाईला दुधाची आंघोळ : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलनदुधदर वाढीसाठी गाईला दुधाची आंघोळ  
आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली रास्ता रोको आंदोलन आटपाडी/प्रतिनिधी : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली आटपाडी तालुक्यात दिघंची, आटपाडी, करगणी, खरसुंडी या चार ठिकाणी दुधदर वाढीसाठी रास्ता रोखून, गाई रस्त्यावर सोडून, गाईला दुधाची आंघोळ घालत आंदोलन करण्यात आले.राज्यात महायुतीच्या वतीने सर्वत्र आज राज्यभर दूध बंद आंदोलन करण्यात आले होते. सरकार विरोधात घोषणा देत, दुध दरवाढ करावी, गाईच्या दुधाला दहा रुपये प्रति लिटर अनुदान द्यावे, दूध भुकटी निर्यातीला प्रति किलो 50 रुपये अनुदान द्यावे या मागणीसाठी आंदोलन करण्यात आले.


या आंदोलनात भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर, माजी उपसभापती तानाजीराव यमगर, जिल्हा परिषद माजी समाज कल्याण सभापती ब्रम्हदेव पडळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विष्णुपंत अर्जुन, रिपब्लिकन पक्षाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र खरात, भाजपचे तालुका अध्यक्ष विलासराव काळेबाग, माजी अध्यक्ष प्रभाकर पुजारी, अण्णासाहेब जाधव, बळीराजा संघटनेचे डॉ. उन्मेश देशमुख, हरी (शेठ) गायकवाड यांच्यासह  कार्यकर्त्यांनी आंदोलनात सहभाग घेतला.

वाचा : शेनवाडीत महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्या कडून महिलेचा विनयभंगकराड-सोलापूर रस्ता दिघंची बसस्थानक चौकात रोखून धरला. रस्त्यावर ठाण मांडत सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या. आटपाडी शहरामध्ये अण्णाभाऊ साठे चौकात लोकशाहीर अण्णा अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त पुतळ्यास गोपीचंद पडळकर यांनी पुष्पहार अर्पण करून आंदोलनाचा प्रारंभ केला. करगणी, खरसुंडी गावात आयोजित केलेल्या आंदोलनात महायुतीचे स्थानिक कार्यकर्ते व शेतकरी सहभागी झाले होते.

वाचा : आटपाडी शहरात एक तर मापटेमळा येथे एक कोरोना पॉझिटिव्ह यावेळी आमदार गोपीचंद पडळकर म्हणाले, केंद्र सरकारने परदेशातून भुकटी आयात केली नाही. सत्ताधारी राष्ट्रवादी काँग्रेस व काही संघटना केंद्र सरकारने भुकटी आयात केल्यामुळे दुधाचे भाव पडले आहेत असा खोटा कांगावा करत आहेत. देवेंद्रजी फडणवीस फडणवीस सरकारने दूध उत्पादक शेतकऱ्यांना 673 कोटी रुपये मंदीच्या काळात दिले होते. कोवीडचे संकट पाहता कोणत्याही व्यापाऱ्याला भुकटी आयात करायचा परवाना दिलेला नाही. याबाबत लोकांच्या जनजागृती करण्यासाठी आंदोलन करण्यात आले.


 फोटो ओळी : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे दूध बंद आंदोलन 

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेसNo comments:

Post a Comment

Advertise