कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 14, 2020

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वातंत्र्य दिनाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमाचे  फेसबुकच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण

माणदेश एक्सप्रेस न्युज


सांगली : भारतीय स्वातंत्र्याच्या 73 व्या वर्धापन दिनी मुख्य शासकीय ध्वजारोहण शनिवार, दि. 15 ऑगस्ट 2020 रोजी सकाळी 9.05 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय सांगली येथील प्रांगणावर जलसंपदा व लाभक्षेत्र विकास मंत्री आणि सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील यांच्याहस्ते होणार आहे. 


कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व नागरिकांना घरबसल्या या कार्यक्रमामध्ये सहभागी होता यावे यासाठी या कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण जिल्हाधिकारी कार्यालयाच्या www.facebook.com/sanglicollectorate या फेसबुक पेजवरून फेसबुक लाईव्ह माध्यमातून करण्यात येणार आहे. तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या कार्यक्रमामध्ये घरी राहूनच डिजीटल माध्यमातून सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी केले आहे.


याव्दारे सांगली जिल्ह्यातील 13 सेतू, 164 महा  ई सेवा केंद्र, 900 कॉमन सर्विस सेंटर व 550 हून अधिक संग्राम केंद्र अशी एकूण 1600 आपले सेवा केंद्रामधून या कार्यक्रमाचे प्रक्षेपण करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांनी सांगितले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise