आटपाडी बस स्थानक परिसरात कोरोनाचा शिरकाव
माणदेश एक्सप्रेस न्यूज
आटपाडी : आटपाडी बसस्थानक परीसरामध्ये कोरोनाने शिरकाव केला असून परिसरातील एका प्रतिष्ठत दुचाकी स्पेअर्स स्पार्ट दुकानाचा मालक त्याची पत्नी व आईस कोरोनाची लागण झाली आहे.
कालच कोरोनाने आटपाडी व्यापारी पेठेमध्ये शिरकाव केला होता. यामध्ये एका कापड व्यापाऱ्यासह कापड दुकानामध्ये काम करण्याऱ्या दोन मुलांना लागण झाली होती.
आज आलेल्या कोरोना अहवालामध्ये स्पेअर्स स्पार्ट दुकानाचा मालक त्याची पत्नी व आई तसेच सागरमळा येथील पुरुष व यपावाडी येथील एका पुरुषाचा समावेश आहे.
Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस