आटपाडी ग्रामपंचायतीच्या ५३ लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न : सरपंच सौ. वृषाली पाटील - mandeshexpress.com

Latest

Advertise

Wednesday, August 26, 2020

आटपाडी ग्रामपंचायतीच्या ५३ लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न : सरपंच सौ. वृषाली पाटील

आटपाडी ग्रामपंचायतीच्या ५३ लाख रुपये निधीच्या विविध विकासकामांचे उद्घाटन संपन्न : सरपंच सौ. वृषाली पाटील 

माणदेश एक्सप्रेस न्यूज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी ग्रामपंचायत १४ वा वित्त  आयोग व दलितवस्ती रस्ते सुधार योजनेअंतर्गत ५३ लाख रुपये निधीतून विविध ठिकाणी रस्ते  गटारी  व पेव्हिंग ब्लॉक  बसवणे  अशा  विविध विकासकामांचे उद्घाटन आटपाडी तालुक्याचे नेते तानाजीराव पाटील व सांगली जिल्हा परिषदेचे  माजी  समाज कल्याण सभापतीव विद्यमान सदस्य  ब्रह्मानंद पडळकर तसेच आटपाडी ग्रामपंचायत प्रथम लोकनियुक्त सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांच्या हस्ते संपन्न झाले .


यावेळी शिवसेना तालुकाध्यक्ष साहेबराव पाटील, अखिल भारतीय सरपंच संघटनेचे कायदेविषयक सल्लागार ॲड. धनंजय पाटील, दत्तात्रय (पंच) पाटील, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश मरगळे, बाळासाहेब मेटकरी,  सौ. लक्ष्मी राजेंद्र बालटे, राजेंद्र बालटे,  ग्रामसेवक दत्तात्रेय गोसावी, आबासाहेब उर्फ दादासाहेब पाटील, प्राथमिक शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व विद्यमान सदस्य यु.टी. जाधव, युवा सेना अध्यक्ष संतोष पुजारी, मधुकर बाळु माळी, अनिकेत अशोक माळी. राजाभाऊ राजमाने, पिनु (पंच) उर्फ आप्पासो माळी, मनोज नांगरे उर्फ कारभारी, संतोष पाटील, मार्केट कमिटी सदस्य विष्णुपंत अर्जुन, अनिल सूर्यवंशी,  भाजपचे माजी तालुकाध्यक्ष प्रभाकर पुजारी, आप्पासाहेब पाटील, प्रदीप आनंदा पाटील, प्रदीप उर्फ बाबू विश्वास पाटील, सचिन सपाटे, मच्छिंद्र पुजारी, कानिफनाथ खंडागळे, सुरज चव्हाण, मनोज देशपांडे, सुखदेव पाटील व त्या त्या भागातील  नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


खालील विकासकामांचे उद्घाटन करण्यात आले असून कामे आजपासूनच  करण्यात येणार आहेत.

  • 1) प्रकाशवाडी  बालाजी मंदिर  येथे सिमेंट काँक्रीट रस्ता करणे  रक्कम रुपये 1 लाख
  •  2) साठे नगर जवळील  दत्तनगर  येथे कारखाना रोड ते गुळीक घर रस्ता डांबरीकरण व गटर करणे-निधी 10 लाख रुपये.
  • 3)  साठे नगर जवळील  दत्तनगर  येथे गुळीक घर ते बालटे वस्ती  कारखाना रोड  सिमेंट काँक्रीट रस्ता करणे - निधी 10 लाख रुपये.
  • 4) सिद्धार्थनगर नूतन भंडारे  यांच्या घराकडे जाणारा  रस्ता तयार करून  पेविंग ब्लॉक बसविणे - निधी 3 लाख रुपये
  • 5) सोमेश्वर नगर-  मंदिरासमोर  पेविंग ब्लॉक बसवणे - निधी 3 लाख रुपये.
  • 6) म्हारनुर वस्ती जवळ श्री. विलास लांडगे यांच्या घराकडे जाणारा रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे - निधी 5 लाख रुपये .
  • 7) शाहू कॉलनी रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे - निधी 3 लाख रुपये.
  • 8) निंबवडे रोड  ते  हॉटेल गार्डन मार्गै धांडोरमळा  कडे जाणारा रस्ता मुरमीकरण करणे - निधी 3 लाख रुपये.
  • 9) विठ्ठल नगर येथे बायपास रस्ता ते धीरज प्रक्षाळे घर मार्गे नंदिवाली वसाहत रस्ता सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे निधी 15 लाख रुपये.

वरील नमूद ठिकाणी रस्त्याची व गटारी ची मागणी बऱ्याच वर्षापासून तेथील नागरिक करत होते. सदर विविध विकास कामांचे प्रत्यक्ष सुरुवात झाल्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज

No comments:

Post a Comment

Advertise