Type Here to Get Search Results !

आटपाडी शहरात पतसंस्था सचिवासह एकूण ९ जण कोरोना बाधित



आटपाडी शहरात पतसंस्था सचिवासह एकूण ९ जण कोरोना बाधित

माणदेश एक्सप्रेस न्युज


आटपाडी/प्रतिनिधी : आटपाडी तालुक्यासह शहरामध्ये ही कोरोनाचे रुग्ण सापडण्याचे प्रमाण वाढले असून आज आलेल्या अहवालामध्ये शहरातील एका नामांकित पतसंस्थेच्या सचिवासह एकूण ९ कोरोनाचे नवे रुग्ण आढळून आले आहेत.


एकूण ९ रूग्णापैकी ६ पुरुष तर ३ महिलांयांचा नवीन कोरोना रूग्णामध्ये समावेश आहे. यामध्ये शहरातील नामांकित पतसंस्था असलेलेल्या संस्थेचा सचिव कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.  


तसेच शहरातील एक शिक्षक व त्याचा मुलगा या दोघांचा अहवाल ही कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. तर शहरातील एका सलून व्यावसायिकाचे कुटुंब ही कोरोना पॉझिटिव्ह आल्याने खळबळ माजली आहे.


दररोज वाढणाऱ्या कोरोना रूग्णामुळे नागरिकांची गरज असेल तरच घराबाहेर पडा, मास्कचा वापर करा व सोशल डिस्टस्निंगचे पालन करा असे आवाहन आटपाडीच्या सरपंच सौ. वृषाली धनंजय पाटील यांनी नागरिकांना केले आहे.    


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad

Hollywood Movies