सांगली शहरात जाणार असेल तर वाहतूकीतील बदल पहा - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 4, 2020

सांगली शहरात जाणार असेल तर वाहतूकीतील बदल पहा


सांगली शहरात जाणार असेल तर वाहतूकीतील बदल पहा  सांगली : सांगली शहरामध्ये वाहनांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून टिंबर एरीया व मार्केट यार्ड परिसरात तसेच रेल्वे स्टेशनचे गोदाम येथे मोठ्या प्रमाणात जड वाहतुक सुरू आहे. या ठिकाणी वाहतुक व्यवस्था सुरळीत राहण्यासाठी पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी वाहतूक नियोजन जाहीरनामा दि. 28 जुलै ते 11 ऑगस्ट 2020 पर्यंत प्रायोगिक तत्वावर प्रसिध्द केला आहे. या जाहीरनाम्यानुसार एकेरी वाहतुक मार्ग पुढीलप्रमाणे - शिंदे मळा रेल्वे ब्रिज पासून रेल्वे वसाहतीकडे (कनुभाई देसाई मिलकडे) जाणारा दक्षिणेकडील रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करणे आवश्यक आहे. कुपवाड येथून सांगलीकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश चालु राहील. टिंबर एरीया कॉर्नर (तथागत गौतम बुध्द प्रवेशव्दार कमान कॉर्नर) ते शिंदे मळा रेल्वे बिजकडे जाणारा उत्तरेकडील रस्ता सर्व वाहनांसाठी एकेरी मार्ग (वन वे) करणे आवश्यक आहे. टिंबर एरीया व मार्केट यार्ड कडून येणाऱ्या वाहनांसाठी कुपवाडकडे जाणाऱ्या वाहनांना प्रवेश चालु राहील.नागरिक, रहिवाशी, मोटार वाहन चालकांनी व जनतेने नमूद बदल केलेल्या वाहतूक नियोजनास सहकार्य करावे. हरकती, सुचना सहा. पोलीस निरीक्षक वाहतुक नियंत्रण शाखा सांगली किंवा पोलीस अधीक्षक कार्यालय विश्रामबाग सांगली यांच्याकडे लेखी स्वरूपात पाठवाव्यात. जेणेकरून प्राप्त झालेल्या सुचनांचे अवलोकन केल्यानंतर वाहतूक नियोजनात योग्य ते बदल करण्यात येतील, असे पोलीस अधीक्षक सुहेल शर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस

No comments:

Post a Comment

Advertise