आजोबा नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं : निलेश राणे - mandeshexpress.com

Latest

Advertise

Thursday, August 13, 2020

आजोबा नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं : निलेश राणे


आजोबा नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं : निलेश राणे

मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येची चौकशी सीबीआयकडे देण्यात यावी अशी मागणी मावळ लोकसभेचे राष्ट्रवादीचे उमेदवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार (Parth Pawar) यांनी केली होती. पार्थ यांच्या मागणीवर आजोबा शरद पवार (Sharad Pawar) यांनी चांगलीच कानउघडणी केली. 


मी माझ्या नातवाच्या मागणीला कवडीची किंमत देत नसल्याचे शरद पवार यांनी सांगितल्याने एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररित्या काढू शकतात हे पहिल्यांदाच पाहिलं आहे असे (Former BJP MP leader Nilesh Rane) भाजपाचे माजी खासदार नेते निलेश राणे यांनी म्हणत आजोबा-नातवाच्या वादात उडी घेतली आहे.

 


निलेश राणे यांनी याबाबत ट्विट केलं आहे. "स्वतःच्या नातवाला ज्या भाषेत पवार साहेबांनी फटकारले वाचून व ऐकून धक्का बसला. एक आजोबा आपल्या नातवाची लायकी जाहीररीत्या काढू शकतात हे पहिल्यांदाच बघितले. पवार साहेब हे जाहीर करा हा राग पार्थने राम मंदिरला समर्थन दिलं म्हणून होता की सुशांत प्रकरणात CBI चौकशीची मागणी केली म्हणून?" असा प्रश्न देखील (Nilesh Rane) निलेश राणे यांनी पवारांना केला आहे.

(Sharad Pawar) शरद पवार यांनी मुंबईतील पत्रकार परिषदेत बोलताना, महाराष्ट्र पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. पण जर कोणी म्हणत असेल, अन्य चौकशीबाबत, तर त्याला विरोध असण्याचे कारण नाही", असे शरद पवार यांनी स्पष्ट केले. याचबरोबर, मी महाराष्ट्र पोलीस आणि मुंबई पोलीसांना 50 वर्षे ओळखतो. माझा महाराष्ट्र पोलिसांवर पूर्ण विश्वास आहे.


चौकशी करायची असेल, सीबीआय किंवा कोणतीही एजन्सी वापरायची असेल, तर मी विरोध करणार नाही, असे (Sharad Pawar) शरद पवार यांनी सांगितले. त्यासोबत, (Parth Pawar)  पार्थ यांनीच याबाबतची मागणी केल्याचं सांगताच, पार्थच्या मताला किंमत नसल्याचे पवार म्हणाले. तो इन्मॅच्युअर आहे, असेही ते म्हणाले होते.

Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस


No comments:

Post a Comment

Advertise