पालकमंत्री जयंत पाटील नागरिकांचा मदतीला ; संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः दिली माहिती - mandeshexpress.com

Latest

Advertise

Tuesday, August 18, 2020

पालकमंत्री जयंत पाटील नागरिकांचा मदतीला ; संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः दिली माहिती

पालकमंत्री जयंत पाटील नागरिकांचा मदतीला ; संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः दिली माहिती

पालकमंत्री जयंत पाटील

सांगली : पावसाचा जोर वाढत असल्याने पश्चिम महाराष्ट्रात पुन्हा पूराचे संकट घोंगावत आहे. याच पार्श्वभूमीवर जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी पालकमंत्री जयंत पाटील स्वतः नदीकाठच्या गावात पोहोचले व त्यांनी नागरिकांना धीर दिला.


संभाव्य पूराचा धोका लक्षात घेता सांगली जिल्ह्यातील नदीकाठच्या गावांना बोटी दिल्या जात आहे. वाळवा तालुक्यातील वाळवा व शिरगाव या गावांना पालकमंत्री जयंत पाटील यांच्या हस्ते बोटी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मंत्री जयंत पाटील यांनी नदीकाठच्या गावांना भेट दिली व संभाव्य पूरपरिस्थितीबाबत नागरिकांना स्वतः माहिती दिली.


कोरोना असो वा महापूर सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील नेहमीच सांगलीकरांच्या मदतीला धावून आले आहेत. मागील वर्षी याच महिन्यात पश्चिम महाराष्ट्रात महाप्रलयंकारी पूर आला होता. त्यावेळीही जयंत पाटील यांनी झोकून काम केले होते. बचावकार्य, मदतकार्य त्यांनी केले होते. अन्न वाटप व इतर अत्यावश्यक गोष्टींचे वाटप त्यांनी केले होते. सांगलीकरांचे एकाप्रकारे अश्रू त्यांनी पुसले होते. 


ज्यावेळी जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यावेळीही पालकमंत्री जयंत पाटील यांनी तात्काळ हालचाली केल्या. इतकेच नाही जिथे कोरोनाचे रुग्ण आढळले त्या हॉटस्पॉट परिसरातही पालकमंत्री जयंत पाटील ग्राऊंड झिरोवर होते. आज संभाव्य पूरपरिस्थितीच्या निमित्ताने पुन्हा एकदा जयंत पाटील लोकांच्या खांद्याला खांदा लावून उभे ठाकले आहेत.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise