अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील ; सुप्रीम कोर्ट - mandeshexpress.com

Latest

Advertise

Friday, August 28, 2020

अंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील ; सुप्रीम कोर्टअंतिम वर्षाच्या परीक्षा घ्याव्याच लागतील ; सुप्रीम कोर्ट  


मुंबई : अंतिम वर्षाच्या परीक्षेची तारीख बदलू शकते, मात्र परीक्षा रद्द केली जाऊ शकत नाही, असा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द होणार नाहीत. कोरोनाचा प्रादुर्भाव पाहता परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी देशभरातून याचिका दाखल झाल्या होत्या


राज्य सरकारांनी पाहिजे तर परिक्षा पुढे ढकलण्यासाठी यूजीसीबरोबर चर्चा करावी असंही राज्यांना सुचवलं आहे. यूजीसीनं परिक्षा घेण्यासाठी जारी केलेलं पत्रक योग्य असल्याचंही सुप्रीम कोर्टानं म्हणाले आहे. 30 सप्टेंबरपर्यंत अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबतचं पत्रक यूजीसीनं जारी केलं आहे.


या सर्व याचिकांवर न्यायमूर्ती अशोक भूषण, न्यायमूर्ती आर. सुभाष रेड्डी आणि न्यायमूर्ती एम. आर. शाह यांच्या खंडपीठासमोर सुनावणी सुरू आहे. ही सुनावणी 18 ऑगस्ट रोजी पूर्ण झाली होती. पण खंडपीठाने आपला निर्णय सुरक्षित ठेवला होता.


Join Free WhatasApp माणदेश एक्सप्रेस न्युज


No comments:

Post a Comment

Advertise